-->
राज्यविशेषसामाजिक

BJS चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर डोंगरगाव येथे सुरू

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोविड मुक्त गाव अभियान प्रत्येक गावात राबविणे आवश्यक आहे आहे. हे काम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी पुणे विद्यापीठ ने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना जी संधी दिली आहे त्या संधीचे सोने करा असे आवाहन भारतीय जैन संघटना वाघोली चे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांनी केले.

 

डोंगरगाव, ता. हवेली येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटना महाविद्यालय, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी होते. यावेळी डोंगरगावच्या सरपंच रजनी कांबळे, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, माजी सरपंच अशोक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गडदे, समुदाय आरोग्य अधिकारी रागिणी भोसले, ग्रामसेवक अतुल कोहिणकर, कला विभाग प्रमुख सिद्धेश्वर गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख बळवंत लांडगे, विज्ञान रुपाली गुलालकरी, अनिल वाघमारे, विलास गडदे आदी यावेळी उपस्थित होते.

 

सात दिवशीय विशेष हिवाळी शिबिरात ग्रामस्वच्छता, श्रमदान, वृक्षारोपण, कोविड समाज प्रबोधन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या विशेष हिवाळी शिबिरात ३६ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून यातून त्यांना स्वतः ला घडविण्याबरोबर समाजात प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची संधी मिळत असल्याचे या शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष शिंदे व सह कार्यक्रम अधिकारी अजय कदम, रुपाली सोनवणे यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close