
करमाळा/प्रतिनिधी


मांगी (ता. करमाळा) येथील शेतकरी नागेश बागल यांच्या गाईचे वासरू बिबट्याच्या हल्यात ठार झाले असून याची प्रत्यक्ष पाहणी आज गुरुवार (दि. १० ऑगस्ट) रोजी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी नागेश बागल यांच्या शेतामध्ये जाऊन केली आहे.
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मांगी येथिल बिबट्याने हल्ला केलेल्या नागेश बागल यांच्या शेतात भेट दिली. तसेच वन विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात कॅमेरे बसविण्याच्या व वाढीव पिंजरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मांगी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
यावेळी सोलापूर व मोहोळ वन विभागाचे अधिकारी वन परिक्षेत्रपाल लटके साहेब, वन निरीक्षक कुरले साहेब, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, अभिमान अवचर, तुषार शिंदे, सुरज ढेरे, आदेश बागल, नागेश बागल, पोलिस पाटील आकाश शिंदे, मनोज शिंदे व शेतकरी उपस्थित होते.



