-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

पोलीस प्रशासन उसवाहतुकदारांना सर्वतोपरी सहकार्य करेन – डि वाय एस पी अजित पाटील व पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचे आश्वासन 

 

करमाळा ( प्रतिनिधी ) 

फसवणूक झालेल्या उसवाहतुकदार यांना पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित पाटील व पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी युवासेना उसवाहतुकदार संघटनेच्या झालेल्या बैठकीत उसवाहतुकदाराच्या शिष्टमंडळास दिले .

 

 

उसतोड पुरवठा मुकादमांकडून उसवाहतुकदार यांच्या झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीबाबत शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी घंटानाद आंदोलन करून वाचा फोडली होती.

 

आंदोलनानंतर अशा फसवणुकीबाबत गुन्हे दाखल करण्यास सुरवात झाली होती मात्र अशा प्रकाराच्या केसेस गुन्हे दाखल करून घेण्यास होत असलेला विलंब तसेच नोटरी, बॅंक व्यवहार तपशील या संदर्भात अनेक तांत्रिक अडचणी असल्याने गुन्हे दाखल करणे किचकट ठरत होते.

 

या संदर्भात आज पुन्हा एकदा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे माजी उप तालुकाप्रमुख व बार असोसिएशन माजी अध्यक्ष अ‍ॅड विकास जरांडे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी उसवाहतुकदारांच्या शिष्टमंडळासह पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक जोतीराम गुजंवटे यांची या संदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

 

चर्चे दरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शिष्टमंडळाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याने गुन्हे दाखल करणे आणखी सोपे होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या सहकार्याबद्दल युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी आभार व्यक्त केले.

 

 

         जिल्हास्तरावर विशेष पथक तयार करणार –

सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या या घटनांबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनातुन जिल्हास्तरावर विशेष पथक तयार करण्यात येणार असून फसवणूक झालेल्या उसवाहतुकदारांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल

श्री आजित पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी)

 

 

 

     वाहतूकदारांनी सजग रहावे

भविष्यात अशा प्रकारे करार करताना सर्व कामगार मुकादम यांचे आपल्या तालुक्यातच करार पत्रक करावे, रोख व्यवहार न करता बॅंके मार्फत किंवा ऑनलाईन व्यवहार करवा ,कामगारांचे चेक घ्यावेत, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे व्हिडीओ उपलब्ध ठेवावेत.

जोतीराम गुंजवटे – (पोलीस निरीक्षक करमाळा)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close