सुरगाणा येथे महाराजस्व अभियानांतर्गत कार्यक्रम उत्साहात संपन्न
माय मराठी न्यूज नेटवर्क


सुरगाणा तहसील कार्यालयाच्या वतीने पोलीस ग्राउंडमध्ये आज दिनांक १७ मे २०२२ रोजी महाराजस्व अभियान अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प सुरगाणा मार्फत बालविवाह प्रतिबंध व आहार जन जागृती विषयक विविध स्टॉल लावण्यात आले. यामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी माहिती, विविध रानभाज्यांची पाककृती व पोषण आहारा विषयक माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते.
या प्रसंगी कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. नितीन भाऊ पवार यांनी भेट देऊन स्टॉल सर्व रानभाज्या व पाककृतींची पाहणी करून महिती घेतली. तसेच त्यांनी महाराजस्व अभियान अंतर्गत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून यातून देण्यात येणारी माहिती सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन शासकीय योजनांची माहिती करून घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी पर्यवेक्षिका सविता होलगडे, जयवंता साबळे, मंगल गायवन, श्रीकांत सोनवणे, मेघा इंगळे, पुष्पा टोपले, भागाबाई पवार, छाया भुसारे, हिराबाई पवार, यमुना कुंभार आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. कव्हले सर, सर्व पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.




