-->
करमाळाराजकिय

केत्तुरच्या उपसरपंचपदी श्री. प्रशांत नवले यांची बिनविरोध निवड

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी श्री. प्रशांत देवराव नवले यांची आज बिनविरोध निवड पार पडली. प्रशांत नवले हे आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक असुन माजी पंचायत समिती सदस्या सौ. शारदाताई नवले यांचे चिरंजीव आहेत.

 

 

यापुर्वी त्यांचे घरातील सदस्य सौ. निर्जलाताई प्रविण नवले व वडील देवराव नवले यांनीही सरपंच पदे भुषविली आहेत. नुतन उपसरपंच प्रशांत नवले यांचे निवडीबद्दल सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक श्री. राजेंद्रसिंह पाटील, करमाळा बार असो. चे उपाध्यक्ष माजी सरपंच अॅड. अजित विघ्ने, माजी सरपंच सुहास निसळ, माजी उपसरपंच बाळासाहेब जरांडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव नगरे, लक्ष्मण खैरे, शहाजी पाटील, राजुशेठ कटारिया व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close