-->
करमाळाविशेष

करमाळा-हिवरवाडी- वडगाव (द.) रस्त्याची दुरावस्था; बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष

ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे मुश्किल!!!

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा, हिवरवाडी ते वडगाव (द.) या रस्त्याची दुरावस्था झाली असून याकडे सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी व गावप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे वडगाव (द.), हिवरवाडी, भोसे, शेळके वस्ती, रोडगे वस्ती, मेरगळ वस्ती व सुरवसे वस्ती या परिसरातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

या परिसरातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थी याच रस्त्यावरून करमाळा येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. करमाळा शहरापासून वडगावचे अंतर अवघे ६ किमी आहे. परंतु, हे अंतर पार करण्यासाठी ३० ते ४० मिनिटे एवढा वेळ लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविने जिकिरीचे झाले आहे.


रस्त्याच्या दुरावस्थेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; उशिरा सुचले शहाणपण

पावसाळा सुरू होण्या अगोदरच रस्त्यावरील लहान मोठे खड्डे बुजून घेणे व रस्त्यावरील पाणी बाजूच्या चारीमध्ये काढून देणे गरजेचे असताना पावसाळा संपल्यानंतर रस्त्यावरील पाणी बाजूला काढण्याचे उशिरा शहाणपण सुचले त्यासाठी ही शालेय विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयापुढे आंदोलन करावे लागले.


रस्त्याच्या साईट पट्टीवरून पाईपलाईन; बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र गप्प

      वडगाव (द.) ते हिवरवाडी या ३ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्यापैकी जवळपास २ कि.मी. रस्त्याच्या बाजूने साईट पट्टीवरून पाईपलाईन खोदली आहे. यामुळेही संबंधित पाईपलाईन खोदनाराकडून रस्त्याचे व रस्त्यावरील पुलाचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता पाणी पुरवठा विभागाशी चर्चा करू असे उत्तर दिले जात आहे.


करमाळा ते हिवरवाडी हा रस्ता दुरुस्तीसाठी सोलापूरला प्रस्ताव पाठविण्यात आला असून तात्पुरत्या स्वरूपात मजूर पाठवून रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी बाजूला काढण्यात आले आहे.

श्री. कन्हेरे एम. के.  अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, करमाळा

 

करमाळा ते हिवरवाडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी मागणी केल्यास प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून मुरूम टाकून देण्याचे सहकार्य करू. याबाबत हिवरवाडी गावच्या सरपंच सौ. पवार यांच्याशी ही बोलणे झाले आहे.

प्रा. रामदास झोळ,  संस्थापक/अध्यक्ष, प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close