-->
करमाळाराजकिय

भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते खडकेवाडीत विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायत अंतर्गत खडकेवाडी येथे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतून व सोलापूर जिल्हा नियोजन समिती (DPDC) अंतर्गत १ कोटी १६ लाख रु. निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा करमाळा भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते आज (दि. १५ सप्टेंबर) रोजी करण्यात आले.

 

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, विकासकामाच्या बाबतीत खडकेवाडी गावाला मोठी गरज होती. त्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत ७१,२६,६९७ रु, खडकेवाडी गाव ते खडकेवाडी फाटा रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी २८,५०,००० रु, किसन माने ॲडीशनल डीपीसाठी १२,५०,००० रुपये, स्ट्रीट लाईट दिवे २,००,००० रुपये, शाळा दुरुस्तीसाठी २,००,००० रु एवढा भरघोस निधीसाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष घालून ही कामे मंजूर केली आहेत.

 

भविष्यात विविध विकासकामांच्या बाबतीत खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण आणखी कामे करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय शिंदे यांनी तर प्रास्ताविक भाजपा सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले. तसेच किरण शिंदे यांनी आभार मानले.

 

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, आजिनाथचे माजी संचालक विठ्ठलभाऊ शिंदे, मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, धर्मराज नाळे, देवळालीचे माजी उपसरपंच संदिपान कानगुडे, शहाजी बापू पाटील, बिटरगाव (श्री) चे सरपंच अभिजीत मुरूमकर, वंजारवाडी चे सरपंच प्रवीण बिनवडे, मिरगव्हाणचे सरपंच मच्छिंद्र हाके, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, पांडेचे उपसरपंच नितीन निकम, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रणदिवे, झरे ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ घाडगे, जयंत काळे पाटील, गणेश महाडीक, नवनाथ खाडे, भैयाराज गोसावी तसेच खडकेवाडी येथील बंडू शेळके, पोपट शेळके, गणेश माने, शहाजी जाधव, रमेश जगदाळे, कल्याण शेळके, श्रीराम शेळके, जांबुवंत शेळके, आजिनाथ शेळके, उत्तरेश्वर शेळके, संतोष चौधरी, बळीराम चौधरी, मनोहर शेळके, भारत जाधव, दयाराम जाधव, अशोक शेळके, अशोक जाधव, रघुनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य संजय चौधरी, सागर शिंदे, अक्षय शेळके, प्रवीण शेळके, ज्योतीराम शेळके, तुळशीराम शेळके, अजित शिंदे, संदीप शेळके, महेंद्र जाधव, प्रज्वल जगदाळे, दत्ता सुरवसे, रोहिदास शेळके, मनोहर शेळके, अमोल चौधरी, शहाजी जाधव, नितीन कानगुडे, पंकज बिचितकर, दिपक गायकवाड, विनोद इंदलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close