-->
करमाळाराजकिय

शेटफळचे सरपंच, उपसरपंचासह अनेक पदाधिकाऱ्यांचा आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शेटफळ नागोबाचे (ता. करमाळा) येथील नागनाथ दूध संस्थेचे चेअरमन मनोहर पोळ, सरपंच विकास गुंड, उपसरपंच शिवाजी पोळ, व्हा. चेअरमन विकास पोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पोळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य तसेच शेकडो ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, हर्षल बागल, संचालक धनंजय मोरे, विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख, सुरज ढेरे उपस्थित होते.

 

आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (ता. माढा) येथील निवासस्थानी रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायं. ६:०० वाजता करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतः फेटा, हार व श्रीफळ देऊन शिंदे गटात प्रवेश स्वीकारला. यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी शेटफळ (ना.) येथील सर्व कार्यकर्त्यांना काळजी करू नका. ज्या विश्वासाने तुम्ही माझ्या गटात प्रवेश केला, त्याच विश्वासाने तुमच्या गावातील विकासाची कामे करणार असून, तुमचे प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न सुद्धा सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी माजी उपसरपंच भारत पाटील, युवराज नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, काकासाहेब गुंड, गुलाब पोळ, दत्तात्रय पाटील, बापुराव गुंड, सतीश पोळ, रणजीत लबडे, नवनाथ पोळ, सुधीर पोळ, नागनाथ जाधव, महादेव गुंड, सोसायटी सदस्य तुकाराम गुंड, विशाल पोळ, तुकाराम चोरगे, सचिन पोळ, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुहास पोळ, अमोल पोळ, राहुल लबडे, महारुद्र पोळ, राजेंद्र पोळ, जिवराज पोळ, सोमनाथ गुंड, किरण पोळ, देविदास पवार, नाना नाईकनवरे, अद्युम गुंड, उमेश घोगरे, धनाजी गायकवाड, राहुल शिंदे, प्रदीप पोळ, आशिष गुंड, पोपट पोळ, रवींद्र पोळ, बाबुराव गुंड, नागनाथ पोळ, नितीन धेंडे, अजिंक्य गुंड, अरुण नवले, नानासाहेब कळसाईत, समाधान गुंड, रामभाऊ पोळ, सचिन पोळ, नागनाथ जाधव, सुधीर पोळ, सोमनाथ गुंड, बापूराव गुंड, विशाल पोळ, रवींद्र पोळ, विठ्ठल गुंड, बाबुराव गुंड, महारुद्र पोळ, सचिन पोळ, अरुण नवले, अर्जुन नाईकनवरे यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close