सिना कोळेगाव प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन मिळवण्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्वोतपरी प्रयत्न करणार- आ. संजयमामा शिंदे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सीना कोळगाव प्रकल्पांतर्गत ज्या ७३२ शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या आहेत. परंतु, त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पर्यायी जमिनी मिळालेल्या नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जाधव साहेब यांचे कक्षात करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्रालयात स्तरातून सदर प्रस्तावाबाबत त्वरित कार्यवाही करण्यासाठी व बाधित शेतकऱ्यांना जमीन मिळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी उपस्थितांना सांगितले.
सदर बैठकीसाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपजिल्हाधिकारी गायकवाड मॅडम, सिना कोळगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये पर्यायी जमिनी संदर्भात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जमिनी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव तयार केलेला असून सदर प्रस्ताव परिपूर्ण करून १५ दिवसांत शासनाकडे दाखल करणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. जाधव साहेब यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू झोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर, कंदरचे सरपंच भास्कर नाना भांगे, करमाळा तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने निमगाव ग्रामपंचायत सदस्य हनुमंत निळ, पत्रकार अमित जागते, प्रहार तालुकाध्यक्ष विकी मोरे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पाटील, उत्तम शिंदे, घाडगे सर, श्रीराम नीळ, प्रहार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, आमदार संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संजय आंबोले साहेब, इत्यादी मान्यवर तसेच मिरगव्हाण, आवाटी, कोळगाव, निमगाव, हिवरे येथील प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते. सदर बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले.



