गणेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळेच मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश- किरण बागल

प्रतिनिधी/ करमाळा


मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात करण्यासाठी आज पर्यंत करमाळा तालुक्यातील कोणत्याही राजकीय नेत्याने पाठपुरावा केला नाही. मांगी तलाव कुकडी लाभ क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन महा स्वाक्षरी अभियान राबवले. तसेच शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुणे येथील शासकीय विश्रामगृहात खा. निंबाळकर यांच्याकडे निवेदन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे याचा सतत पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कुकडी प्रकल्पाच्या फेरजल नियोजनामध्ये मांगी तलावाचा समावेश करणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. हे काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून सदर काम येणाऱ्या काळात पूर्ण होईल. मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये. या कामाचे श्रेय भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनाच जाते. असे मत मांगी गावचे प्रगतशील शेतकरी किरण बागल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मांगी तलाव कुकडी लाभ क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी या भागातील शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला व हे काम पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
विठ्ठलराव शिंदे
प्रगतशील शेतकरी, पोथरे.



