-->
करमाळादेशराजकियराज्य

पोथरे येथे भाजपाच्या वतीने मन की बात व टिफिन बैठक कार्यक्रम संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने पोथरे (ता. करमाळा) येथील आनंदी लॉन्स मंगल कार्यालयात रविवार (दि. ३० जुलै) रोजी देशाचे भाग्यविधाते, यशस्वी, कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यानंतर उपस्थित सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी यांनी मिळून एकत्र स्नेहभोजन केले. सर्वांनी स्वतःच्या घरून जेवणाचे डबे आणले होते.

 

या प्रसंगी उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मार्गदर्शन करताना टिफिन बैठकीचे महत्त्व सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर टिफिन बैठका आयोजित करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे आपल्याही करमाळा तालुक्यात प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी टिफिन बैठकीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी भाजपचे मोहन शिंदे, किरण बागल, बिटरगाव चे सरपंच अभिजित मुरूमकर, बाळासाहेब होसिंग, नितीन झिंजाडे, यशवंत झिंजाडे, आप्पा खटके, गणेश वाळुंजकर, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे, मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, संतोष वाळुंजकर, दादा झिंजाडे, योगेश रंदवे, सुभाष शिंदे, नवनाथ नाळे, दादासाहेब शिंदे, दादा झिंजाडे, नवनाथ झिंजाडे, धनंजय झिंजाडे, शामराव झिंजाडे, नामदेव शिंदे, सोमनाथ नंदरगे, विनोद शिंदे, शिवाजी रोही, शहाजी शिंदे, विनोद शिंदे, महादेव गोसावी, भूषण नलवडे, विनोद इंदलकर, दगडू गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close