
करमाळा/प्रतिनिधी


मांगी (ता. करमाळा) येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन चे ऑपरेटर, मनमिळाऊ श्री विकास मुंढे यांची बदली बार्शी येथे झाली असून त्याबद्दल त्यांचा सत्कार शनिवार (दि. १५ जुलै) रोजी मांगी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. गेल्या नऊ वर्षांपासून ते मांगी सबस्टेशन येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.
या सत्कार प्रसंगी गावचे उप सरपंच नवनाथ बागल, राजेंद्र बागल, गणेश नरसाळे, सुधाकर नरसाळे, तात्या शिंदे, अभिमान अवचर, तंटामुक्त अध्यक्ष राजाभाऊ बागल, अनिल पाटील, अभिजित बागल, राहुल बागल, नितीन बागल, विनोद नरसाळे, दिपक नरसाळे, सतीश तरटे, डॉ भैरवनाथ बागल, सचिन बागल, किरण बागल, जेष्ठ नागरिक पांडुरंग शिंदे, भालचंद्र शिंदे, सोपान बारवकर, अमोल गायकवाड, सुनील बागल, पंकज बागल, शरद बागल, चंद्रकांत राऊत, जेष्ठ नागरिक राजाभाऊ क्षिरसागर, उमेश बागल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ बागल यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण बागल यांनी मानले.




