कुंभेज येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळापुर्व अभियान मेळावा’ उत्साहात संपन्न
प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे कुंभेज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज मंगळवार दि. १९ एप्रिल २०२२ रोजी शाळा पुर्व अभियान मेळावा क्रं.०१ अतिशय आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सकाळी ०७:३० वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक समवेत गावातुन वाजत-गाजत प्रभात फेरी काढण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. गणेश किसन कादगे व उपाध्यक्ष श्री. मधुकर भोसले, यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन संरपच सौ. सिंधुताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात दाखल पात्र विद्यार्थी व पालक तसेच माता पालक उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सात टेबलावर दाखल पात्र मुलांचे वेगवेगळ्या क्रिया घेऊन सेल्फी पाॅईट, फोटो काढून तसेच मुलांना गुलाब पुष्प देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निमगिरे मॅडम व श्री. कन्हेरे सर यांनी त्यांचे स्वागत केले.
सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिंदे वस्ती शाळा मुख्याध्यापक श्री लोंढे सर, श्री. लक्ष्मण भंडारे सर, चांदणे वस्ती शाळा मुख्याध्यापक श्री. सोहणी सर, पवार वस्ती शाळा मुख्याध्यापक श्री. आमृळे सर, कुंभेज शाळेतील शिक्षक श्री. भारत शिंदे सर, मुलाणी सर, श्री. कात्रेला सर, वर्षा माळी मॅडम, आशा माळी मॅडम तसेच सर्व अंगणवाडी ताई यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निमगिरे मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने करुन कार्यक्रम यशस्वीरीत्या व ऊत्साहात पार पाडला.



