
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ॲड. विकास जरांडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असून या प्रसंगी करमाळा तालुका वकील संघाच्या नविन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
यामध्ये अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी ॲड. विनोद चौधरी, सहसचिव पदी ॲड. सुनील घोलप यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. सोनवणे हे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आहेत.
या निवडीनंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस.पी. लुणावत, ॲड. एस.पी. रोकडे, ॲड. भाऊसाहेब वाघमोडे, ॲड. बाबुराव हिरडे, ॲड. ए. एस. गिरंजे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. राजेश दिवाण, ॲड. सविता शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वच विधीज्ञानी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी करमाळा वकील संघाचे बहुसंख्य विधीज्ञ हजर होते.




