-->
करमाळामनोरंजनराज्य

“झ्या”लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक पुरस्कार पटकावेल-आमदार मानसिंगराव नाईक

 

माय मराठी न्युज प्रतिनिधी

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते दिपक यांच्या सरदार हरबा फिल्मस निर्मित “झ्या” एक पारंपारिक वेदनेचा जोखड” या लघुपटाचा प्रिमियर शो विश्वासराव नाईक महाविद्यालयात शिराळ्याचे आमदार मानसिंगराव (भाऊ) नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाच्या पोष्टरचे अनावरण करुन चित्रपटातील कलाकार संस्कार पवार, अशोक भिसे, शैलेजा बागडे, रंगराव घागरे, मेकअप अर्टिस्ट सलिका पठाण, कँमेरामँन आनंद काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आ.नाईक म्हणाले की, आजच्या आधुनिक युगातही देशात गाढवांबरोबर आपले गाढवमय शोषीत जीवन जगत असणाऱ्या लोकांच्या जीवनमानावर मनाला झोंबुन जाणारे भाष्य झ्या लघुपटाच्या माध्यामातुन या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक दिपक पवार यानी प्रभावीपणे केला आहे. हा चित्रपट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावुन शिराळ्याच्या शिरपेचात नक्कीच मानाचा तुरा रोवेल असा विश्वास व्यक्त करुन चित्रपटास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सांगली जि.प.मा. उपाध्यक्ष सत्यजित(भाऊ) देशमुख, सांगली जि.प.मा. बांधकाम सभापती वाळव्याचे जेष्ठ नेते मा. रविंद्र बर्डे(काका), सुनंदा दुध चेअरमन युवानेते मा. सत्यजित नाईक, युवानेते नगरसेवक मा. विश्वप्रतापसिंह नाईक, वाळवा पं.स.मा. सभापती सुवर्णा जाधव, शिराळ्याच्या नगराध्यक्षा सुनिता निकम, शिराळ्याच्या मा. नगराध्यक्षा नगरसेविका सुनंदा सोनटक्के, कराड लोकमतचे उपसंपादक मा. प्रमोद सुकरे सर, कराड पुढारीचे पत्रकार बालीश थोरात, रंगराव घागरे, पिंटु पाटील, गणेश सावंत, गजानन सोनटक्के, विश्वास महिंद, राजेंद्र निकम, बंटी पाटील, गजानन पाटील, कृष्णा नलवडे, विनय हसबनिस, अमर भोरे, बाळासो गोसावी, उत्कर्ष पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चित्रपट कलाकारांची उपस्थिती होती.

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिपक पवार यांनी या चित्रपट निर्मितीचा उद्देश व अनुभव सांगुन त्यांच्या आगामी काळातील चित्रपट वाटचाली विषयीचा मानस व्यक्त केला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक अमर भोरे यानी केले तर आभार कृष्णात नलवडे यानी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close