-->
करमाळासामाजिक

युवासेनेच्या वतीने मिरगव्हाण, लावंड वस्ती येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील लावंड वस्ती वरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज (दि. १७ जून) रोजी युवासेनेच्या वतीने शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

 

युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या संकल्पनेतून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “भगवा सप्ताह” हा कार्यक्रम सुरु असुन या उपक्रमांतर्गत आज करमाळा तालुक्यातील लावंड वस्ती शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थांना वही, पेन तसेच पट्टी, शाॅपनर, खोडरबर, सिसपेन्सील यासह खाऊ चे वाटप करण्यात आले.

 

यावेळी मुख्याध्यापक प्रमोद काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन लावंड, ग्रामपंचायत सदस्य पै. श्रिराम सुरवसे, पै. मोतीराम लावंड, बिरू ठोंबरे सर, युवासेना शाखाप्रमुख निरंजन निकम आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून युवासनेचे कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close