
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


आजपासून (१५ जुन) नवीन शालेय वर्ष सुरू झाल्याने जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गजबजून गेल्या आहेत. शाळेत पहिल्या दिवशी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे युवासेनेकडुन गुलाबपुष्प देऊन व मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले. हिवरे ता. करमाळा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम पार पडला.
शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प, मिठाई मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड झाल्याने शिक्षकांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे, शाखाप्रमुख निरंजन निकम, सरपंच दत्तात्रय माळी, उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे, मुख्याध्यापक सुग्रीव निळ, सहशिक्षक निळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, नवनाथ खरात, सुरेश शिंदे, सतिश सुर्यवंशी, पल्लवी कुलकर्णी गणेश माने आदी उपस्थित होते.



