
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त करमाळा तालुका शिवसेना युवा सेना यांच्या वतीने आज दि. १७ नोव्हेंबर रोजी जिन मैदान येथील युवासेना संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी करमाळा शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, विधानसभा संघटक संजय शिंदे, शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी करमाळा शिवसेना उपतालुकाप्रमुख बंडू शिंदे, अॅड. विकास जरांडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख मयुर यादव, शहरप्रमुख समीर हालवाई, तालुका समन्वयक पांडुरंग ढाणे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळेस शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.




