
करमाळा/प्रतिनिधी


कंदर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये बागल, शिंदे आणि पाटील या तिन्ही गटाने एकत्र येऊन शेतकरी विकास सहकारी पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवली. यामध्ये बागल, शिंदे नारायण पाटील युतीच्या गटाने १३ पैकी ९ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. विजयी उमेदवार बबन लोकरे, राजकुमार पराडे, सागर शिंदे, रावसाहेब जाधव, उर्मिलाताई जगताप, विजयसिंह जिजाबा नवले, नवनाथ शंकरराव भांगे, विलास केरू माने, रामभाऊ भगत यांचा सत्कार मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते करमाळा येथील बागल संपर्क कार्यालयात संपन्न झाला.
या प्रसंगी आदिनाथचे संचालक नानासाहेब लोकरे, मार्केट कमिटीचे संचालक रंगनाथ शिंदे, मकाईचे संचालक बापूराव कदम, मच्छिंद्र वागज, बाळासाहेब पराडे, गोपाळराव मंगवडे, ब्रह्मदेव आरकिले, भीमराव इंगळे, धर्मा लोकरे, काकासाहेब शिंदे, सुभाष काका पवार, अण्णा शिंदे, रवी काका गरड, पांडुरंग पराडे, अजिंक्य काळे, विवेक भोसले, कुबेर शिंदे, विष्णुपंत माने, महादेव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिग्विजय बागल यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी भ्रमणध्वनीवरून विजयी उमेदवारांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.



