-->
करमाळाक्राईम

केम येथील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत; ‘यांनी’ केली पी.आय. कोकणे साहेबांकडे निवेदनाद्वारे मागणी

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम या शांतता प्रिय गावातील खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक कोकणे साहेब यांना समक्ष लेखी निवेदन देऊन केली आहे.

सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, करमाळा तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम गावात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, पोलीस अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. याला पोलीसांचा आशीर्वाद आहे का.? अवैध धंध्यामध्ये बेकायदेशीर दारू, मटका, जुगार, सावकारी असे धंदे खुलेआम सुरू आहेत. या मुळे गरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. तरूण वर्ग मटक्याच्या आहारी गेला आहे. केम गावात मोठया प्रमाणावर मटका सुरू आहे. गावात दहा ते पंधरा अवैध धंदे करणारे एजंट आहेत. चौका चौकात टपऱ्यामध्ये हा व्यवसाय सुरू आहे. तरी माननीय कोकणे साहेब यांनी लक्ष घालून हे धंदे बंद करावेत. अन्यथा शिवसेना महिला महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा देण्यात आला आहे.

तसेच केम पोलीस चौकीसाठी पूर्वीचे देवकर साहेब यांच्याकडे केमचा चार्ज देण्यात यावा. अशी ही मागणी केली आहे. देवकर साहेब यांनी केम येथे चांगलाच धाक बसविला होता. त्यांना केम येथील खडान खडा माहिती आहे. आता सध्या केम गावामध्ये पूर्वीप्रमाणे पोलीसाचा धाक राहिला नाही. त्यांची बदली झाल्यापासून खुले आम धंदे सुरू आहेत. तरी योग्य ती कारवाई करावी. यावेळी निवेदन देताना शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण, शहरप्रमुख आशा मोरे, मंजुळा पळसकर, दुर्गळे मॅडम उपस्थित होत्या. शिवसेना महिला आघाडीने हा प्रश्न हाती घेतल्याने त्यांचे सर्वत्र महिला वर्गातून कौतुक केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close