
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. नानासाहेब निळ मित्र मंडळ व ग्रामपंचायत निमगाव (ह.) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी करमाळा तालुक्यातील निमगाव (ह.) येथे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोळगाव- निमगाव- गौंडरे ‘ या रस्त्याचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. नानासाहेब नीळ सर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कोळगाव- निमगाव- गौंडरे या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असून पावसाळ्यात या रस्त्याने नागरिकांना ये जा करता येत नाही. तसेच रस्त्यावर खड्डे असल्याने पावसाळ्यात या मार्गावरील एस टी बस सेवा बंद असते. त्यामुळे नागरिक व विद्यार्थी यांची गैरसोय निर्माण होते. तसेच याचा नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर ऊस वाहतुकीसाठी सुद्धा हा रस्ता खूप धोकादायक ठरत होता. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आमदार संजय मामा शिंदे यांनी या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करून ही अडचण सोडवली आहे.

या बरोबरच निमगाव येथे आमदार फंडातून महादेव मंदिर सभामंडपासाठी ७ लाख रुपये, दलित वस्ती सिमेंट काँक्रेट रस्ता करण्यासाठी ४ लाख ३१ हजार रुपये, जनसुविधा मधून सिमेंट काँक्रेट रस्ता करण्यासाठी ३ लाख रुपये मंजूर केलेले आहेत. या सर्व कामांचे भूमिपूजन व जानपीर दर्गा सभामंडपाचे लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमासाठी तानाजी (बापू) झोळ, दशरथ (शेठ) घाडगे, दत्ता जाधव, सुभाष (नाना) हनपुडे, बाळासाहेब जगदाळे, दिनकर (दादा) सांगडे, भरत (भाऊ) अवताडे, तात्यासाहेब शिंदे, प्रकाश थोरात, समाधान दौंड, मानसिंग खंडागळे, प्रदीप दौंड, महादेव धोंडे, सुनिता माळी, समाधान भोगे, महेश जाधव, धनु (आबा) फरतडे, अंकुश हंडाळ, अमोल फरतडे, जयराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अधिकाधिक नागरिकांनी सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव (ह) चे सरपंच लखन जगताप, उपसरपंच श्रीकांत नीळ व ग्रामसेवक मनोज लटके यांनी केले आहे.




