ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांचा टायगर ग्रुप च्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार

करमाळा/प्रतिनिधी


दैनिक लोकमतचे करमाळा तालुका प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांनी त्यांचा करमाळा येथील संपर्क कार्यालयात यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव म्हणाले की, करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर हे एक निर्भीड पत्रकार असून त्यांनी आजपर्यंत करमाळा तालुक्यातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य आपल्या लेखणी द्वारे केले आहे. पत्रकारिता करणे हे एक सतीचे वाण असून नासीर भाई यांची पत्रकारिता निर्भीड असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून बोलताना सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी सत्काराला उत्तर दिले ते म्हणाले की, माझा हा सत्कार मी कधीही विसरणार नाही. यावेळी सदर कार्यक्रमाला मनसेचे नाना मोरे, संभाजी होनप, जावेद आतार, अमोल परदेशी, बबलू पठाण तसेच सोहेल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.



