-->
आरोग्यकरमाळासामाजिक

करमाळ्यात डायलिसिस प्रक्रिया यशस्वी; ५ मशीन द्वारे रोज १० रुग्णांना मिळणार डायलेसिस ची सेवा

 

 

करमाळा/प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने करमाळा येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून आज येथे प्रथम रुग्णाला डायलिसिस सेवा देण्यात आली. ही सेवा करमाळ्यात उपलब्ध झाल्यामुळे संबंधित रुग्णांना आधार निर्माण झाला आहे.

 

स्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने ही सेवा आजपासून करमाळा येथे सुरू करण्यात आली आहे. केम (ता. करमाळा) येथील रामेश्वर बिचितकर या रुग्णाला आज सेवा देण्यात आली. यासाठी डॉ. बबन यमकर व श्री बबन मुळे यांनी देखभाल केली.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर सुरू झाले आहे.

 

यावेळी यशस्वी डायलिसिस सेवा पूर्ण झाल्यानंतर रामेश्वर बिचतकर यांचा सत्कार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरसिंह चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे, राजेंद्र मेरगळ, संजय जगताप, मारुती भोसले, निलेश चव्हाण आदी जण उपस्थित होते.

 

या प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून ही डायलिसिस सेवा या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भावी काळात पूर्ण अल्प दरात सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात काम करणार असल्याचे सांगितले.

 

श्री कमला भवानी ब्लड सेंटरची सुरुवात करून करमाळा तालुक्यातील रुग्णांना करमाळ्यातच रक्त पिशवी मिळवून देण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close