-->
करमाळाराजकियसामाजिक

८० टक्के समाजकारण डोळ्यासमोर ठेवूनच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना व कार्यकर्ते कटिबद्ध- जिल्हाप्रमुख महेश चिवटे

शिवजयंती निमित्त शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने विविध कार्यक्रम

 

करमाळा/प्रतिनिधी

लहान मुलांमधील कलागुणांच्या विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी युवा सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा व त्याला मिळत असलेला प्रतिसाद हा कौतुकास्पद असून अशा स्पर्धेच्या माध्यमातून फिल्मी दुनियेतील कलाकार निर्माण होऊ शकतात. असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले. करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित विविध स्पर्धां कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, प्रसिद्ध उद्योजक अल्ताफ शेठ तांबोळी, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना शहरप्रमुख संजय शीलवंत, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, देवळाली शाखाप्रमुख सुधीर आवटे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, युवा सेनेचे नेते प्रफुल्ल शिंदे, निलेश जोशी, आकाश सिंधी, लखन ननवरे, स्वाती माने आदि जण उपस्थित होते. युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

 

शिवसेना महिला आघाडीच्या करमाळा तालुकाध्यक्षा प्रियंकाताई गायकवाड बोलताना म्हणाल्या की, एसटी बस मध्ये ५० टक्के महिलांना सवलत देऊन खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान केला आहे. शिवाय महिला बचत गटांसाठी कर्जाची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविण्यात आले असून ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम एकनाथ शिंदे यांनी हातात घेतले असून लवकरच महिलांची कॅन्सर तपासणी व उपचाराचे शिबिर महिला आघाडी तर्फे घेण्यात येणार आहे.

 

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात येणार असून ८० टक्के समाजकारण डोळ्यापुढे ठेवूनच करमाळा शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना व त्यांचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close