-->
करमाळाराजकिय

सोसायटीची सभासद यादी प्रसिद्ध न करता जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करावा- औदुंबरराजे भोसले पाटील

करमाळा/प्रतिनिधी

 

कोणत्याही संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्या अगोदर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे गरजेचे असते. परंतु नेरले विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मतदार यादी प्रसिद्ध न करता यादी प्रसिद्ध केल्याची बनावट कागदपत्रे तयार करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. हा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात यावा व बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यावर फसवणुकीच्या गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नेरले (ता.करमाळा) गावंचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी मा. सहाय्यक निबंधक करमाळा व सहाय्यक संचालक निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.

 

या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, चेअरमन व गावातील सभासद यांच्या समक्ष पंचनामा करणे आवश्यक होता. मतदार यादी मध्ये १०० ते १२५ सभासदांना विनाकारण वगळण्यात आले आहे. सन २००९ ते २०१४ या कालावधीत संचालिका असणाऱ्या सौ अलका पाटील तसेच २००९ च्या निवडणुकीला उभे असणारे श्री शहाजी पाटील व सौ विजया भोसले पाटील या तिघांना देखील वगळण्यात आले आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील व माढा तालुक्यातील १०० ते १२५ लोकांची नियमबाह्य, बेकायदेशीर, रहिवासी खातेदार नसताना नावे समाविष्ट केली आहेत.

 

सहकारी संस्था या गावच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आल्या असून सर्व सभासद या संस्थेचे मालक असतात. संस्थेच्या कार्यालयासाठी प्रत्येक महिन्याला भाडे आकारले जाते. संस्थेचे कार्यालय नेरले गावात आहे का? संस्थेचे सचिव नेरले गावात केव्हा असतात? असे प्रश्न उपस्थित करून संस्थेचा वापर सचिव व चेअरमन स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीची संस्था असल्यासारखे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सोसायटीचे सचिव सदाशिव पाटील यांनी स्वतःसह बंधू गणेश पाटील व सौ पूजा पाटील यांची नावे सभासद यादीमध्ये समाविष्ट करून आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचाही आरोप केला आहे.

बाहेरगावचे बोगस मतदान हे होणारच नाही. त्यासाठी कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

औदुंबरराजे भोसले पाटील माजी सरपंच, नेरले

 

माझ्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे असून ते बिनबुडाचे आहेत. मी नियमाप्रमाणे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे.

सदाशिव पाटील, सचिव, वि.का.से.सो. नेरले

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close