कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


संपूर्ण मानवजातीला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीचे संकट गणपती बाप्पा ने दूर करावे यासाठी साकडे घालत तसेच नागरिकांनी देखील कोरोना काळात सोशल डिस्टनसिंग चे पालन करत, मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या वंदना विजय गव्हाणे यांनी केले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील अचानक मित्र मंडळाच्या गणपती समोर कोरेगाव भीमा येथील महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा अथर्वशीर्ष पठनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा गणेश फडतरे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, मंडळाचे शहाजी ढेरंगे, श्रीरंग काशीद, अरविंद गव्हाणे, बबलू शिंदे, भाऊसाहेब ढेरंगे, गौरव शिपलकर यांच्यासह असंख्य महिला व गणेशभक्त उपस्थित होते. यावेळी अथर्वशीर्ष पठनाच्या बरोबर गणपती ची आरती जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व इतर महिलांच्या हस्ते करण्यात आली.



