-->
करमाळाराजकियसामाजिक

हिवरे, कोळगाव, निमगाव, गावांना वगळून जाणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता ! नागरींकाकडून नाराजीचा सुर

आमदारांनी लक्ष घालण्याची युवासेनेची मागणी

 

करमाळा प्रतिनिधी

 

पुर्वभागातील फिसरे हिसरे,हिवरे कोळगाव निमगाव या रस्त्याच्या दुरुस्थी साठी नुकताच ८ कोटी ८६ लाख रू निधी मंजूर झाला असल्याचे वृत प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करुण आमदार संजयमामा शिंदे व प्राशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत होते मात्र हिवरे,कोळगाव निमगाव या गांवाना वगळून एक ही वाडी वस्ती, शाळा, मंदीर नसलेल्या मार्गावरून हा रस्ता थेट गौंडरेला जोडला जाणार असल्याचे समजल्याने हिवरे कोळगाव निमगाव या तीन गावातील नागरिकांकडून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

पुर्वभागातील फिसरे ते गौंडरे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे. फिसरे ,हिसरे हिवरे कोळगाव निमगाव ते गौंडरे हा संपूर्ण रस्ता मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन पुर्ण करावा अशी अनेक दिवसांची या गावातील नागरींकाची मागणी होती.

 

या अगोदर निमगाव पासुन गौंडरे पर्यंतचे दोन तिन किलोमीटर रस्त्याचे प्राधान मंत्री ग्राम सडक योजनेतुन काम पुर्ण होत आहे. व काल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन फिसरे हिसरे हिवरे कोळगाव निमगाव या रस्त्यासठी ८ कोटी ८६ लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर झाल्याने वरील गावांचा राज्य क्रमांक ६८ या मुख्य रस्त्यास जोडणारा प्रवास सुखकर होण्याचे वृत्त व मंजुरीचे परिपत्रक

आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले होते. मात्र या निधीतुन हिसरे पासुन पुढे हिवरे ,कोळगाव निमगाव या गावांचा रस्ता न होता हिसरे मधून थेट गौंडरे ला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने हिवरे ,कोळगाव निमगाव या भागातील नागरिकांकडून तिव्र नाराजी चा सुर उमटत आहे.

 

हिवरे ,निमगाव ,कोळगाव या रस्त्यावरुनच परिवहन विभागाची बस धावत असते या तीन गावांची मिळुन दहा ते बारा हजार लोकसंख्या असून शेकडो विद्यार्थी गौंडरे,हिसरे,व करमाळा येथे शिक्षणासाठी ये जा करत असतात. त्याच बरोबर संपुर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिवरे येथील श्री नागनाथ देवस्थान अनेक भाविक येत असतात मात्र असे असताना मुख्यमंत्री सडक योजनेतुन आलेला निधी या रस्त्यावर खर्च न होता ज्या जिथे एकही लोकवस्ती नाही,मंदीर नाही शाळा नाही गाव नाही अशा रस्त्यावर हा निधी खर्च कशासाठी? व कोणाच्या सोयीसाठी केला जात आहे? असा संतप्त सवाल हिवरे ,कोळगाव निमगाव या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

         आमदार संजय मामा शिंदे यांनी लक्ष घालावे

पत्रकार व युवासेना तालुकाप्रमुख या नात्यांने मि स्वतः देखील या मागणीसाठी वारंवार अंदोलनं करून फिसरे पासुन गौंडरे पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यासाठी प्रधान मंत्री किवा मुख्यमंत्री सडक योजनेतुन निधी उपलब्ध करून हा रस्ता डांबरीकरण करावा अशी सातत्यपूर्ण मागणी करत होतो .निधी मंजूर झाल्याचे समजल्यानंतर आनंद झाला मात्र तीन गावांना वगळून हिसरे मधून हा रस्ता थेट गौंडरे ला जाणार असल्याचे समजले त्यामुळे तीन गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा कोणताच फायदा होणार नसल्याने

 आमदार संजयमामा शिंदे यांना संपर्क साधून हा रस्ता मुख्य रहदारीच्या मार्गावरूनच करावा अशी विनंती केली आहे. लवकरच पुर्वभागातील युवकांचे शिष्टमंडळ घेऊन आमदार संजयमामा शिंदे भेटून निवेदन देणार आहोत. 

 

   शंभूराजे शाहुराव फरतडे 

युवासेना तालुकाप्रमुख (ठाकरे गट)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close