
करमाळा/प्रतिनिधी


शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसा निमित्त धगटवाडी रावगांव (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊ वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वाचन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या प्रसंगी सर्व विद्यार्थी यांना जेष्ठ नागरिक कुंडलिक धगाटे यांच्या हस्ते इंग्रजी सुलेखन वही, कार्बन, पेन्सिलसह खोडरबर भेट देण्यात आली, तसेच बिस्किट पुड्यांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भरत धगाटे, मारुती धगाटे, पैगंबर शेख, वल्ली शेख, दादा शिंदे, विजय धगाटे, रामचंद्र धगाटे, सौ. पद्मिनी धगाटे, सौ. रुपाली जाधव, समीना शेख शिवाजी शेळके, शिक्षक संतोष फुंदे, अशोक बरडे आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.



