-->
आरोग्यकरमाळाराजकियसामाजिक

शिवजयंतीनिमित्त घोटी येथील आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची मोफत तपासणी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कौतुकास्पद उपक्रम

 

करमाळा/प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त घोटी (ता. करमाळा) येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तीनशे रुग्णांची तपासणी करून मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. विजय डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अभिजीत बगाडे, डॉ. निलेश कुबेर, डॉ. प्रियंका साळुंखे, आरोग्य सहाय्यक तोडकरी, दत्ता कावळे, सुरेखा सावरे, वर्षा पोतदार डॉ. महेश तळेकर या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली.

 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, हिवरवाडीचे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, वैद्यकीय मदतकक्षाचे सहाय्यक रोहित वायबसे, कोळगाव शाखाप्रमुख नागेश चेंडगे, घोटीचे सरपंच सचिन अण्णा राऊत, विठ्ठल म्हेत्रे, मेजर तात्या नवरे, घोटीचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रसाद काका पाठक, सुधीर राऊत, प्रवीण राऊत, वैभव राऊत, सुनील डिकोळे, सुभाष थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वाडी-वस्तीवरील वरील रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गावात धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखान्याची गाडी जाणार असून रुग्णांना घरपोच तपासणी व औषधी देण्यात येणार आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close