-->
करमाळाराजकिय

खडकेवाडी येथील स्ट्रीट लाईट दिव्याचे भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते उद्घाटन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

माढा लोकसभा मतदासंघांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सण २०२१-२२ च्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले आहेत. या स्ट्रीट लाईट दिव्याचे उद्घाटन आज खडकेवाडी (ता. करमाळा) येथे भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

 

या उद्घाटन प्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, सण २०१९-२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्व खासदार फंड हा आरोग्य विभागात खर्च करण्यात आला होता. त्यामुळे विकास कामांना खोडा निर्माण झाला. परंतु, येणाऱ्या काळात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त गावांना विकास कामे मंजूर करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच खडकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणेश चिवटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी (DPDC) निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 

यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, झरे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, भैया गोसावी, तसेच खडकेवाडी येथील किरण शिंदे, अशोक जाधव, भारत चौधरी, प्रविण शेळके, धनंजय शिंदे, अजित शिंदे, तुळशिराम शेळके, संदीप शेळके, दत्ता सुरवसे, पोपट शेळके, रघुनाथ माने, रमेश जगदाळे, शहाजी जाधव, बंडू जाधव, संतोष चौधरी, शहाजी जाधव, आजिनाथ शेळके, इंद्रजीत शिंदे, बळीराम चौधरी, जांबुवंत शेळके, सोमा जाधव, शिवाजी शिंदे, रेवन्नाथ शेळके, संजय चौधरी, दत्तात्रय जाधव, धनंजय शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close