-->
करमाळामहिलाविषयकविशेष

कौतुकास्पद: मकर संक्रांती निमित्त सोनाली बोबडे यांच्याकडून महिलांना विविध वनस्पतींची रोपे भेट

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

मकरसंक्रात हा प्रामुख्याने स्त्रियांसाठी खूप महत्वाचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. तसेच शेतातील धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. परंतु करमाळा शहरात राहणारे मुळ वाशिंबे येथील प्रा. मनोज बोबडे यांच्या पत्नी सोनाली बोबडे व आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी स्त्रियांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त विविध फळझाडे, फुलझाडे, औंषधी वनस्पती भेट म्हणून देतात.

 

सोनाली मनोज बोबडे यांनी पर्यावरणाचा विचार करून चायना व प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यात आणायच्या नाहीत व इतरांनाही वस्तू न वापरण्याचा सल्ला उपस्थित स्त्रीयांना दिला. तसेच मकर संक्राती निमित्त हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना दरवर्षीप्रमाणे प्लॅस्टिक किंवा इतर वस्तू देण्याऐवजी भेट म्हणून फळझाडे, औषधी वनस्पती, फुलझाडे, शोभिवंत झाडे, विविध कमळाचे प्रकार, वन झाडे अशा सर्व प्रकारची रोपे भेट म्हणून दिली.

 

बोबडे दांपत्य हे नेहमी मित्र परिवाराच्या वाढदिवसाला किंवा शुभ कार्याला गेल्यावर भेट म्हणून एक झाडाचे रोप देतात. तसेच दरवर्षी करमाळा तालुक्यातील विविध शाळांना वृक्ष भेट देतात. महत्वाचे म्हणजे कोणत्याही कुटुंबातील जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यांची अस्थी नदीत विसर्जित करून पाणी प्रदूषित न करता खड्डे खोदून त्यात अस्थी विसर्जन करून वृक्षारोपण करणार्या कुटुंबाला मागेल ती फळझाडे त्यांच्या श्री नर्सरी मार्फत मोफत देतात.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close