-->
करमाळाराजकिय

आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते देवीचामाळ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

श्री देवीचामाळ (ता. करमाळा) येथे आज सोमवार दि. ९ जानेवारी रोजी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत श्री कमला भवानी मंदिर परिसरातील एकूण ४ कोटी ४२ लाख रुपये निधीतून उभारलेल्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

 

या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना आ. शिंदे म्हणाले की, यापुढेही श्री कमला भवानी मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी पर्यटन विभागाकडून ही निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आज शुभारंभ केलेल्या कामांमध्ये सदर ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कसलीही कुचराई न करता हे काम चांगल्या व उच्च दर्जाचे काम करावे यासाठी सूचना दिल्या.

 

यावेळी वाशिंबे गावचे नवनिर्वाचित सरपंच तानाजीबापू झोळ, विवेक आण्णा येवले, सुजीततात्या बागल, श्रीराम आप्पा फलफले, गावचे सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले, दादासाहेब पुजारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले, नवनाथ सोरटे, दत्ता रेगुडे, पै. अनिल पवार, राजेंद्र पवार, ग्रा. पं सदस्य संतोष पवार, सचिन शिंदे, श्रीदेवीचामाळ युवक नेते तुषार आबा जगताप, अमोल चव्हाण, सहाय्यक अभियंता उबाळे साहेब, कन्हेरे रावसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close