-->
करमाळा

धक्कादायक: लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यातच नवविवाहितेचा खून; नवऱ्यासह सासू, सासरे अटकेत

मुलीचा मृतदेहावर माहेरच्यांनी घरी आणून केला अंत्यसंस्कार; आरोपींना फाशी देण्याची आईची मागणी

 

करमाळा/प्रतिनिधी

करमाळा येथील कोमल सुभाष यादव हिचा चार महिन्यापूर्वी माळशिरस तालुक्यातील नेवरे येथील गणेश पांडुरंग गायकवाड याच्याशी दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी नेवरे या गावी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. नंतर अवघ्या चारच महिन्यात या नवविवाहितेचा सासू, सासरा व नवऱ्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मयत कोमल ची आई राणी सुभाष यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
लग्नानंतर सासू मनीषा, सासरा पांडुरंग व नवरा गणेश हे तिघे मिळून कोमल ला मानसिक त्रास देत होते. तुला चुलीवरचा स्वयंपाक येत नाही, तु लवकर उठत नाही, असे काहीना काही कारण सांगून त्रास देत होते. तुझ्यापेक्षा मला सुंदर मुलगी मिळाली असती, अजूनही मला चांगले चांगले स्थळ येत आहेत असे म्हणून नवरा गणेश मानसिक व शारीरिक त्रास देत होता. माहेरच्या लोकांना फोन करू देत नव्हता.

आत्ताच्या आता मला पंधरा हजार रुपये माहेरुन आणून दे म्हणून १८ डिसेंबर २०२२ रोजी कोमलला सासू, सासरा व नवरा गणेश यांनी बेदम मारहाण करत तिचा गळा दाबून खून केला. खून उघडकीला येऊ नये म्हणून तिने फास घेतला असल्याचा बनाव केला. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलच्या माहेरकडील यादव कुटुंबांना आपली मुलगी सिरीयस आहे. तिला नेण्यासाठी या असे म्हणून फोन केला. यावेळी यादव कुटुंबातले सदस्य अकलूज येथे गेले असता कोमल चा मृत्यु झाला असून पोस्टमार्टम सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिसात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. यावेळी कोमलच्या माहेरकडील लोकांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका घेतली. यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोमलच्या माहेरकडील लोकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

या प्रसंगी संतप्त झालेल्या यादव कुटुंबाने मृतदेह आम्ही आमच्या घरी जाऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे स्पष्ट बजावून मृतदेह करमाळा येथे आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लग्नानंतर केवळ चार महिन्यात कोमलचा निर्घृण खून सासू, सासरे व नवरा यांनी केला असून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मयत विवाहितेची आई सुभाष यादव यांनी केली आहे.

कोमल यादव मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले असून अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी आहे. नेवरे भागातील चांगला बागायतदार शेतकरी नवरा मिळाला म्हणून संपूर्ण यादव कुटुंब खुश होते. पण चारच महिन्यात आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ यादव कुटुंबावर आली आहे.

या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात नवरा गणेश पांडुरंग गायकवाड, सासू मनीषा पांडुरंग गायकवाड व सासरा पांडुरंग रामचंद्र गायकवाड यांच्यावर भादवी कलम 302 /304/34/ 304 /बी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. खून करणे, मानसिक त्रास देणे व पुरावा नष्ट करणे असा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तीन आरोपींना तात्काळ अटक केली आहे. कोमलच्या दुर्दैवी मृत्युनंतर मैत्रिणी व नातेवाईकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close