-->
करमाळासामाजिक

मला मिळालेला पुरस्कार हा विद्यार्थी सहशिकक्षक यांना अपर्ण- सुग्रीव निळ

प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण

मला मिळालेला गुणवंत शिक्षक पुरस्कार हा माझे सर्व सहकारी सहशिकक्षक तसेच विद्यार्थी यांना अर्पण करतो. असे भावनिक उद्गार हिवरे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुग्रीव निळ यांनी बोलताना व्यक्त केले.

डाॅ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समीती व हिवरे ग्रामपंचायत यांच्या वतीने निळ यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, सरपंच दत्तात्रय माळी, उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभूराजे फरतडे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे उपस्थित होते.

यावेळी अधिक बोलताना सुग्रीव निळ म्हणाले की, १९८७ ते आजपर्यंत पस्तीस वर्षांच्या कालावधीत शिक्षकी पेशा संभाळताना निरपेक्ष पणे विद्यार्थी घडवण्याचे काम केले. आपल्या हातून घडलेला विद्यार्थी जेव्हा चांगला अधिकारी किंवा आदर्श नागरिक बनतो तोच खरा शिक्षकांसाठी पुरस्कार असतो. परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा पुरस्कार मला मिळाला. मी एक निमित्तमात्र असून हा पुरस्कार तुम्हा सर्वांना अर्पण करून उर्वरित सेवेत देखील अधिक जबाबदारीने विद्यार्थी व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करु असे अभिवचन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिकक्षक जालिंदर हराळे, सतिश सुर्यवंशी, नवनाथ खरात, पल्लवी कुलकर्णी, सुरेश शिंदे, दुधाळ गुरुजी, अंकुश माने आदिनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सहशिकक्षक निळकंठ हनपुडे यांनी केले तर आभार शंभूराजे फरतडे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close