-->
करमाळाक्रीडा

उत्तरेश्वर विद्यालयातील ‘या’ विद्यार्थ्यांनी केले तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे आयोजित तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत केम (ता. करमाळा) येथील श्री. उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तसेच विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. अमोल तळेकर सर यांना रामकृष्ण परमहंस कॉलेज, उस्मानाबाद मध्ये नियुक्ती मिळाल्याबद्दल त्यांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने आज शनिवार दि. १० डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

 

या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी सर व पर्यवेक्षक श्री. सांगवे बी. व्ही सर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तसेच क्रीडा शिक्षक प्रा. अमोल तळेकर सर यांना रामकृष्ण परमहंस कॉलेज उस्मानाबाद येथे नियुक्ती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक कदम सर, सांगवे सर, पालक श्रीहरी तळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा. अमोल तळेकर सर यांचे तसेच महानवर सर व मोमीन सर यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर क्रीडा स्पर्धा दि. ८ डिसेंबर ते ०९ डिसेंबर या दोन दिवसांत करमाळा येथे पार पडल्या.

या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत केले यश संपादन
१४ वर्षे वयोगट :-
१) वीरधवल शेखर गाडे (थाळी फेक स्पर्धेत करमाळा तालुक्यात प्रथम)

२) कृष्ण गजानन गावडे (थाळी फेक स्पर्धेत करमाळा तालुक्यात द्वितीय)

३) अमृता गणेश खूपसे (उंच उडी स्पर्धेत करमाळा तालुक्यात प्रथम)

१७ वर्षे वयोगट :-
१) ओंकार भीमराव दौंड (थाळी फेक स्पर्धेत तालुक्यात द्वितीय)

१९ वर्षे वयोगट :-
१) ओंकार धनंजय घाडगे (थाळी फेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम)

२) संकेत मच्छिंद्र भोसले (कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम)

३) नितीन गोरख डुकळे (उंच उडी स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक)

४) वैष्णवी कोळी (थाळीफेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम)

४८ किलो वजन गट:-
१) चेतन श्रीहरी तळेकर (कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक)

यावेळी प्रा. तळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मार्गदर्शन केले. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री. वाघमारे के एन सर यांनी केले तर आभार कोंडलकर पी. डी सर यांनी मानले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close