-->
करमाळासामाजिक

केम येथील श्री उत्तरेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम (ता. करमाळा) येथे आज शनिवा दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री. कदम एस बी सर यांच्या हस्ते करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

श्री .उत्तरेश्वर विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वाघमारे के. एन सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाची माहिती सांगितली. तसेच मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यातील शहीद, शूरवीराना श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ही भाषणे केली व संविधानाविषयी आपले मत व्यक्त केले.

या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक सांगवे बी. व्ही सर, जाधव जी. के सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close