
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शहरासह , कोर्टी, राजुरी, शेलगाव, पोंधवडी येथील शेकडो युवकांनी आज युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या झंझावताने प्रेरित होवुन युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली येथील युवासेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, शिवसेना विधान सभा संघटक संजय शिंदे (नेते), शहर प्रमुख प्रवीण कटारिया, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी मयुर यादव, शहरप्रमुख समीर परदेशी, युवासेना शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष भालेराव, पंकज परदेशी युवासेना तालुका उपप्रमुख सरपंच समाधान यादव, तालुका चिटणीस पांडुरंग ढाणे, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, सोशल मिडीया समन्वयक अजयराजे साखरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन स्वागत करण्यात आले. या प्रवेश कार्यक्रमा दरम्यान दर्शन कुस्कर (कोर्टी)यांची युवासेना महाविद्यालय कक्ष प्रमुख पदी तरी कल्पेश राक्षे (करमाळा ) यांची युवासेना उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
या वेळेस बोलताना शहरप्रमुख प्रवीण कटारिया म्हणाले युवासेना हिच भविष्यातील शिवसेना असून आजच्या संघर्षांच्या कालावधीत युवासैनिंकावर मोठी जबाबदारी असुन युवकांनी एकनिष्ठ पणे काम करून पक्षाचा नावलौकिक वाढवावा,आम्ही कायम तुमच्या सोबत असल्याचे सांगीतले.
युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी सर्व युवकांचे स्वागत केले. अधिक बोलताना फरतडे म्हणाले की,
युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, जिल्हा प्रमुख सचिन बागल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी युवक यांच्या प्रश्नावर युवासेना सातत्याने आवाज उठवत असुन भविष्यात आणखी अक्रमक पणे काम करुन युवक, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील
प्रत्येक वॉर्डात युवासेना शाखा स्थापन करणार – कल्पेश राक्षे
नव्याने नेमणूक झालेले युवासेना उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे म्हणाले कि पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार असून प्रत्येक वार्डात युवासेना शाखा स्थापन करून संघटना वाढीसाठी प्रत्यण करणार असल्याचे सांगीतले.
महाविद्यालयातील युवक युवासेनेच्या प्रवाहात आणणार- दर्शन कुस्कर
नव्याने नेमणूक झालेले काॅलेज कक्ष प्रमुख दर्शन कुस्कर म्हणाले प्रत्येक महाविद्यालयात युवासेनेचे पदाधिकारी नेमणूक करणार असून जास्तीत जास्त युवकांना युवासेनेच्या प्रवाहात आणुन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध असल्याचे सांगीतले.




