
माय मराठी न्यूज नेटवर्क


द बंटवाल फाऊंडेशन व रोटरी क्लब पुणे (RCPC) यांच्या माध्यमातून पांडेश्वर या गावात पिण्याच्या पाण्याची सोय व पाणी साठवणूक टाकी देण्यात आली. द बंटवाल फाऊंडेशन चे संस्थापक प्रभाकर बंटवाल व सौ. सुमलता यांनी हे काम पुर्ण करून गावच्या विकासाला हातभार लावला. या प्रसंगी क्लब चे अध्यक्ष मॅाईज चक्कीवाल, सचिव कुरेश कपाडीया, महेंद्र बांगे, हेमा पांडे, मझाहिर, तसेच सर्व रोटरी सभासद यांनी उपस्थित राहून सर्व कामांची पाहणी केली.
पांडेश्वर ची सुकन्या सौ. वैजयंता महेश गजरे यांनी बंटवाल फाऊंडेशन व रोटरी क्लब पुणे यांनी पांडेश्वर या गावाप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले.
गावातील विद्यमान सरपंच किशोर लवांडे, माजी सरपंच प्रताप रासकर, प्रकाश आबा शिंदे, संतोष शिनगारे, वैभव थिकोळे, लतिफ शेख, उल्हास नाळे, रियाज शेख, सागर जाधव, शैलेश रोमण तसेच सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सर्वांचे आभार मानले.
रोटरी क्लब व द बंटवाल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून असाच गावचा विकास व्हावा. हे कळकळीचे आवाहन ग्रामस्थांनी केले. यावेळी रोटरी क्लब चे प्रोजेक्ट डायरेक्ट पंकज आपटे यांनी कार्यक्रमाची व कामांची थोडक्यात माहीती दिली. रोटरी क्लब सभासदांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.




