
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. संजयमामा शिंदे यांनी राजुरी ता. करमाळा येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून राजुरी गावापासुन सावडी- करमाळा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील महत्वाचा पुल (ब्रीज) तातडीने मंजुर करून आज वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. वास्तविकतः या पुलाची तेथे आत्यंतिक गरज भासत होती. कारण या ठिकाणी असणारा ओढा आणि रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे व तेथे असणारा प्रचंड चढ यामुळे तेथे वाहनांना जाणे जिकरीचे होते.
या रस्त्यावरून वाशिंबे, केत्तुर, गोयेगाव, सोगाव, उंदरगाव, मांजरगाव, पारेवाडी कडील ग्रामस्थांना सावडी, राशिन, कोर्टी, करमाळा कडे जाताना तसेच मकाई, अबालिका आणि बारामती ॲग्रो कारखान्याला जाण्याऱ्या ऊसाची वाहतुक करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. येथुन एसटी महामंडळाच्या बस ला देखिल येण्या जाण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. परंतु, आमदार संजयमामा शिंदे यांचे सहकार्यातुन राजुरकरांच्या मागणीला यश आले आहे.
राजुरीकरांना या पुलाच्या कामाबरोबरच इतर अनेक रस्त्यांची कामे देखिल मंजुर केलेली असुन, इतर कामे ही प्रगतिपथावर आहेत.
राजुरी येथे एमएसईबी चे सबस्टेशन देखिल होणार असुन या भागातील विजेचा महत्वाचा प्रश्न मिटणार आहे. आज सर्वत्र प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होत असुनही राजुरीच्या या महत्वाच्या झालेल्या पुलामुळे नागरिकांची होणारी अडचणींची शर्यत संपली आहे. सर्व राजुरी व परिसरातील ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्या कामाबद्दल आभार व्यक्त केले.



