-->
करमाळाराजकिय

करमाळा उपजिल्हा रुग्णालयासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद- आ. संजयमामा शिंदे

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५० खाटांचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे रुग्णालय तसेच इमारत बांधकामासाठी जुलै २०२१ मध्ये २५.२० कोटी ची प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. सदर उपजिल्हा रुग्णालयासाठी २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार निधीची तरतूद केलेली आहे.

 

सदर निधी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हुडको या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला असून सदर निधी वितरित करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालेला असून लवकरच या बांधकामाची निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.

 

सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ग्रामीण रुग्णालय बांधकाम करण्यासाठी ३२ कोटी ७४ लाख ९१ हजार चा निधी हस्तांतरित करण्यात आलेला असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ५१ ग्रामीण रुग्णालयाच्या बळकटी करण्यासाठी या निधीच्या उपयोग होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close