-->
आरोग्यकरमाळासामाजिक

हिवरे जिल्हापरिषद शाळेत डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

हिवरे ता. करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती असलेल्या लेखाचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्याचबरोबर डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावर निंबध स्पर्धा घेण्यात आली. तसेच आज असलेल्या जागतिक हात धुवा दिना निमित्त हात धुण्याचे फायदे व स्वच्छतेचे महत्व सहशिकक्षक निळकंठ हनपुडे यांनी विद्यार्थांना सांगितले.

यावेळी उपसरपंच दिलीप भाऊ फरतडे, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभूराजे फरतडे, मुख्याध्यापक सुग्रीव निळ, सहशिकक्षक पोपट दुधाळ, शिवाजी खरात, सतिश सुर्यवंशी, पल्लवी कुलकर्णी, जालिंदर हराळे, सुरेश शिंदे, अंकुश माने, विनोद पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close