
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


पोमलवाडी ता. करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तालुक्यातील सर्वात मोठा पहिला सुसज्ज संगणक कक्ष उभारण्यात आला आहे. या संगणक कक्षाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार पाटील, सूर्यकांत (भाऊ) पाटील, ॲड. अजित विघ्ने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील पोमलवाडी ग्रामपंचायत, शालेय शिक्षण समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरपंच संग्राम पाटील मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थांतर्फे सोमवार दि.०३ ऑक्टोंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच तेथील बागेमध्ये वृक्षारोपन करण्यात आले. येथील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात एक आकर्षक बाग तयार केलेली आहे.
पोमलवाडी येथिल कु. मोनाली भोपते व कुटुंबियांनी पोमलवाडी प्राथमिक शाळेला २० संगणक संच भेट दिलेले असुन, सुसज्ज लॅब तयार करण्यात आली आहे. तसेच शाळेत सुसज्ज इनडोअर गेम्स हॉल, सायन्स हॉल तयार करणात आलेला आहे. शालेय परिसरासह पोमाई मंदीर परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत यांनी पोमलवाडी ग्रामस्थांचे, सरपंच आरडे, उपसरपंच हनुमंत भोपते, सर्व सदस्य आणि सुजान ग्रामस्थ व शिक्षकांचे अभिनंदन केले. पोमलवाडी गावातील संगणक कक्ष, सायन्स वॉल, इनडोअर गेम्स हॉलचे कौतुक केले. याप्रसंगी गणेश करे पाटील यांनी देखिल आपले मौलिक विचार व्यक्त करून गावचा गुणगौरव केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अनिल पानसरे गुरुजी यांनी तर प्रास्ताविक श्री. सिंकदर शेख गुरुजी यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित आय.टी. इंजिनियर मोनाली भोपते, माजी सरपंच संग्राम पाटील, संभाजी भोपते यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक तानाजी येडे, केंद्राध्यक्ष विकास काळे, सरपंच उमेश आरडे, तुळशीदास भोपते, हरि बाबर, उकले साहेब, राजेंद्र देवकर, पोपटराव फाळके, संजय देवकर, राजेंद्र उगले, प्रमोद खाटमोडे, पिटु काळे, लक्ष्मण फडतरे सर, महादेव गायकवाड, यशवंत काळे, डिगांबर पिसाळ यांचेसह ग्रामस्थ, महीला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



