
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या सन २०२१-२२ च्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांना दिली.
करमाळा तालुक्यातील जातेगाव, मोरवड, खांबेवाडी, खडकी, कामोने, कुसकरवाडी, आवाटी, निमगाव (ह), नेरले, घारगाव, शेलगाव (क), देवीचामाळ, रायगाव, लिंबेवाडी, राखवाडी, वाघमारे वस्ती, बिटरगाव (श्री), वंजारवाडी, पिंपळवाडी, हिवरवाडी, मिरगव्हाण, करंजे, पांडे, वीट, रोशेवाडी, देवळाली, खडकेवाडी, हिवरे या गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले आहेत.
यावेळी अधिक बोलताना चिवटे म्हणाले की, सन २०१९-२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्व खासदार फंड हा आरोग्य विभागात खर्च करण्यात आला होता. त्यामुळे ईतर विकासकामे करण्यासाठी खोडा निर्माण झाला होता. परंतु, येणाऱ्या काळात खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.




