-->
करमाळाकृषी विषयकक्राईम

बनावट खताच्या वापरानंतर केळीची रोपे करपली, शेतकऱ्याची तक्रार; कृषी अधिकारी यांनी केला पंचनामा

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

वरकटणे ता. करमाळा येथील रवींद्र दत्तात्रय देवकर या शेतकऱ्यांनी परंडा येथील स्वामी समर्थ कृषी केंद्र या सेवा केंद्रातून पोटॅश खताची खरेदी केली होती. मात्र हे खत वापरल्यानंतर पीक करपली अशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर या शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत कृषी आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री. धनंजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी शंकर मिरगणे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन शिल्लक असलेल्या २५ पोत्याचा पंचनामा केला व खताचा नमुना काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

 

एप्रिल २०२२ मध्ये परंडा भागात स्वस्त दरात पोटॅश खत मिळते म्हणून सौंदे, आळसुंदे, वरकटणे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोटॅश खते आणली होती. मात्र हे खत बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी हे खत व्यापाऱ्यांना परत देऊन आपले पैसे परत आणले होते. रवींद्र देवकर या शेतकऱ्यांनी मात्र या खताचा वापर केला. या वापरानंतर माझी केळीचे झाडे करपली असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या शेतकऱ्याकडे खत खरेदी केल्याचे कोणतेही बिल नाही किंवा संबंधित दुकानदाराकडून खत खरेदी केला याचा पुरावाही नाही. मात्र त्यांनी आपण स्वामी समर्थ कृषी केंद्र परांडा या दुकानातून खत खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन संशयित खताचे नमुने काढले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पंचनामे योग्य पद्धतीने केले आहेत. शेतकऱ्यांनी ही अधिकृत दुकानातून अधिकृत पावती घेऊनच रासायनिक खते खरेदी करावीत. स्वस्त खते मिळतात म्हणून आमिषाला बळी पडू नये.

मा. संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा.

 

प्राप्त झालेल्या तक्रारीची कसून चौकशी सुरू आहे दोषींवर कारवाई करण्यासाठी कृषी खाते कटिबद्ध आहे.

श्री. बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

 

संबंधित संशयित पोटॅश खत इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या बॅगमध्ये आहे. मात्र या खत खरेदीची पावती शेतकऱ्याकडे नसल्यामुळे संशय वाढत आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच खत खरेदी करणे गरजेचे आहे.

श्री.शंकरराव शेंडगे, मार्केटिंग ऑफिसर, इंडियन पोटॅश लिमिटेड.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close