प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


महाराष्ट्रात ८५ हजार केमिस्ट आणि ड्रगिस्ट असून व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी अन्न व औषधे प्रशासन खात्यामार्फत अडचणी सोडविण्यासाठी नामदार राजेंद्र यड्रावकर यांनी प्रयत्न करावेत. अशी मागणी करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे यांनी केली.
मंत्री राजेंद्र यड्रावकर यांची भेट घेऊन दीपक पाटील यांनी केमिस्ट व ड्रगिस्ट औषध विक्रेत्यांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. कोरोना काळात राज्यातील मेडिकल दुकानदारांनी अहोरात्र रुग्णांना सेवा देऊन प्रामाणिकपणे काम केले. आज औषध विक्रेते यांच्यापुढे अनेक अडचणी आहेत. ऑनलाइन मेडिसिन विक्री त्यामुळे रुग्णांची प्रचंड मोठी फसवणूक होत आहे. यावरही नियंत्रण ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा असावी, अशी मागणी दीपक पाटणे यांनी केली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे ही bउपस्थित होते.




