
मावळ/प्रतिनिधी


अनुगामी लोकराज्य महा अभियान च्या माध्यमातुन शिंदे- घाटेवाडी (ता. मावळ) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभिवादन सोहळा पार पडला.
रशियातील मास्को या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या संदर्भात अनुसरुन महाराष्ट्राच्या मातीतील लोकशाहीराला जागतिक पातळीवर योग्य सन्मान दिला गेला यांचा आनंद उत्सव म्हणुन अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार घरा घरात पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश कांबळे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. राजुभाऊ खांडभोर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
*असा लोकशाहीर होणे नाही, त्यांचे विचार प्रत्येक घरा घरा पर्यंत पोहचणे आवश्यकच- डॉ गोपीचंद कचरे*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम भाग जनसेवक प्रा. बाळासाहेब खांडभोर यांनी केले. सचिन भांडे, शिरीष भालेकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर डॉ. गोपीचंद कचरे यांनी प्रबोधन केले. आलेल्या सर्वांचे आभार विठ्ठल कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.
यावेळी अनुलोम उपविभाग जनसेवक शिरीष भालेकर, तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर, मातंग समाज तालुका अध्यक्ष सचिन भांडे, सहादू पोटफोडे, सतीश राजगुरू, विनायक पोटफोडे, रविंद्र हेमाडे, सदस्य शिवराम शिंदे, राजु माझिरे, अशोक खांडभोर, गणेश कांबळे, विठ्ठल कांबळे, दिलीप खांडभोर , हेमंत धोंडगे, सुभाष शिंदे आदि उपस्थित होते.



