
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सरकारी मालकीची जागा स्वतःच्या मालकीची भासवून तशा प्रकारचे खोटे ग्रामपंचायत उतारे तयार करून सदर जागा विक्री करून फसवणूक केल्या प्रकरणी जेऊर येथील ओम हेमंत पांढरे रा. जेऊर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत जेऊर चे माजी सरपंच भास्कर पांडुरंग कांडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणामुळे वेगवेगळ्या वादग्रस्त कामगिरीमुळे चर्चेत असणारी जेऊर ग्रामपंचायत मागील काळात आयुक्त व ग्रामविकास मंत्री यांच्या आदेशाने नियमबाह्य पद्धतीने कामकाज केल्याने बरखास्त करण्यात आली होती. त्यास कोरोना काळात प्रशासकीय कामकाज बंद होऊ नये हा मुद्दा विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
त्यानंतर ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर शासकीय निधी अपहार प्रकरणी जिल्हा परिषद कडून तपासणी झाली होती. वेगवेगळ्या कारणांनी ग्रामसेवक निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे चर्चेत असलेली जेऊर ग्रामपंचायत व सदर माजी सरपंच पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.



