-->
विशेष

सदाशिवनगरला दुसऱ्यांदा तर पुरंदावडे गावाला प्रथमच LIC चा ‘विमा ग्राम पुरस्कार’ जाहीर

 

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)

 

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांचेतर्फे दिला जाणारा ‘बिमा ग्राम पुरस्कार’ सदाशिवनगर ग्रामपंचायत ला सलग दुसऱ्यांदा तर पुरंदावडे ग्रामपंचायतीला प्रथमच मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच केले जाणार असल्याची माहिती LIC प्रतिनिधी श्री. सागर उरवणे यांनी दिली.

 

या पुरस्काराचे स्वरूप बिमा ग्राम पुरस्कार व गावाच्या विकासासाठी १ लाख रुपये निधी असा असणार आहे. यामुळे गावाच्या विकासामध्ये भर पडणार असून आपल्या जीवनशैली मध्ये LIC विमा असणे किती महत्वाचे आहे हे देखील समजणें गरजेचे आहे. धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) अगदी किफायशीर ठरु शकते.

 

या उपक्रमामुळे समाजामध्ये याची जनजागृती तर हाईलच परंतु एक आदर्श देखील निर्माण होईल. या पुरस्कारामध्ये LIC प्रतिनिधी सागर उरवणे यांची मोलाची कामगिरी आहे. त्यांच्यामुळे या दोन्ही गावांच्या विकासामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close