वडगावच्या ग्रामसभेत ‘या’ महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा; ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे सरपंच काळे यांचे आवाहन

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


शुक्रवारी होणाऱ्या ग्रामसभे मध्ये ज्यावेळी वडगावचे मांगी तलावामुळे पुनर्वसन करण्यात आले त्या वेळीचे तलावग्रस्त ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली का नाही.? ह्यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. नुकसान भरपाई मिळाली असेल तर त्याचे पुरावे आपण सरकार दरबारी मागु शकतो किंवा नसेल मिळाली तर पुनर्वसन कायद्यानुसार आपण आपला हक्क आता मागु शकतो.
तसेच पुनर्वसनामुळे वडगाव दक्षिण वनविभागाच्या गट नं. ७६ मध्ये बसवले गेले तर तो संपुर्ण गट गावठाण आहे का.? ह्यासंदर्भात तहसीलदार करमाळा यांचेकडे माहिती विचारून नसेल तर संपुर्ण गट नं. ७६ गावठाण करण्यासंदर्भात ग्रामसभेत निर्णय घेऊन तशी जिल्हाधिकारी यांना विनंती करू शकतो. पुनर्वसन झालेल्या गावांना सरकार कडुन सार्वजनिक विकास कामे म्हणजेच शाळा, मंदिरे, रस्ते, गटारी, बागबगीचे व तत्सम सुविधा देणे गरजेचे असते ते दोन्ही वडगाव वासियांना मिळाले नाही. त्यावर चर्चा करून निर्णय घेणे व पुनर्वसन विभागाला यासंदर्भात निधी मागणे.
ज्या कारणासाठी मांगी तलाव बांधण्यात आला तो सरकारचा उद्देश गेली २० वर्षांपासून तरी सफल होताना दिसत नाही. मांगी तलावाचे पाणलोट क्षेत्र हे आवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाऊस कमी पडतो. कर्जत- करमाळा पाणलोट क्षेत्रातुन येणारे नदी, ओढे व नाले यावर बांधले गेलेले मोठमोठे बंधारे यामुळे मांगी तलावात क्षमते एवढा पाणीसाठा होत नाही. आपण तलावग्रस्त विस्थापितांची व शेतकऱ्यांची मांगी तलावामुळे आसून अडचण नसून खोळंबा झाल्यासारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे आपल्या होणाऱ्या ग्रामसभेमध्ये आपण आपल्या तलावाला कायमस्वरूपी पाणी किंवा आपल्या जमिनी परत आपल्याला मिळाव्यात अशी विनंती जिल्हाधिकारी किंवा उच्च न्यायालय यांना करू शकतो. त्यामुळे मी दोन्ही वडगाव चा सरपंच प्रतिनिधी ह्या नात्याने सर्व ग्रामस्थ, मांगी तलावामुळे विस्थापित व मांगी तलावातील पाण्याचे लाभार्थी यांना विनंती करतो कि, शुक्रवार दि. २६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेला जास्तीत जास्त नागरिकांनी वेळात वेळ काढून उपस्थित रहावे ही विनंती.



