
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव चे सुपुत्र सुभेदार सोमनाथ यशवंत शिंदे (मेजर) या जवानाने भारतीय सैन्य दलात यशस्वीपणे २८ वर्ष सेवा पूर्ण करून निवृत होऊन स्वगृही परतल्याबद्दल त्यांचा जातेगाव ग्रामस्थ व मित्र परिवाराकडून सेवापुर्ती सन्मान सोहळा शुक्रवार दि. ०८ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभेदार सोमनाथ शिंदे यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सन्मान सोहळा कार्यक्रमांमध्ये बोलताना आमदार संजय मामा शिंदे यांनी जातेगाव येथील शहीद जवान मच्छिंद्र संभाजी वारे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच करमाळा तालुक्यातील इतर शहीद जवानाच्या स्मारकांसाठी ही शासन स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य त्रीदल माजी अध्यक्ष मा. संदीप लगड, माढा तालुका माजी सैनिक अध्यक्ष आजिनाथ बोबडे, ॲड. अजित विघ्ने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, माजी जि.प. सदस्य उध्दवदादा माळी, सुजित तात्या बागल, रा. काँ. करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे कर्जतचे औंदुबर निंबाळकर, गावांतील प्रमुख काशीनाथ कामटे, प्रविण शिंदे गुरुजी, तुकाराम पवार, जातेगावचे सरपंच छगन ससाणे, उपसरपंच रमेश पाटील, गोरख पाटील, राजाभाऊ शिंदे, लक्ष्मण माने, प्रकाश पाटील, भैरवनाथ निगडे, रामकृष्ण धुमाळ सर, महेंद्र वारे, प्रमोद वारे, ॲड. बळीराम शिंदे, विठ्ठल शिंदे सर, शब्बीर पठाण, बापू पठाण, बाळू आरडणे तसेच राज्यातून आलेले माजी सैनिक व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते.



